उत्तम आरोग्यासाठी consult doctor also     १. दररोज न चुकता ३० मिनिटे शास्त्रोक्त पद्धतीने चालायाला जा . (लक्षात असू द्या "चालला तो चालला,थांबला तो संपला")     २. दररोज कोणतेही एकतरी फळ खावे. (खास करून सफरचंद,संत्रे,केळे,पपई,सीताफळ,आवळा यापकी एखादे)    ३. दररोज सकाळी अनुशापोटी कोमट पाण्यात एक चमचा लिंबाचा रस व एक चमचा मध घालून प्या.     ४. प्रक्रिया केलेले पदार्थ खाण्याऐवजी शक्यतो पूर्ण जेवण करा.     ५. कृत्रिम रंग व गोडी आणणारी साखर यांचा वापर करून केलेले घन / द्रव पदार्थ खाणे टाळा.      ६. दुपारचे व रात्रीचे जेवणाची सुरुवात सॅलेड खाण्याने करा.      ७. दिवसातून दोन वेळा ३ ते ५ मिनिटे दीर्घ श्वास घेण्याचा  प्रघात ठेवा.     ८. रात्री शांत झोप लागण्यासाठी ,झोपण्यापूर्वी मनाचा थकवा जाऊन मन प्रसन्न  व्हावे यासाठी दोन मिनिटे एखाद्या सुगंधाचा भरभरून वास घ्या.    ९. रात्री झोपण्यापूर्वी अर्धी मूठ आक्रोड खा.     १०. दिवसभर थोड्या थोड्या वेळाने भरपूर पाणी प्या. (दिवसातून किमान 5 लीटर)     ११. सकाळी १०-१५ मिनिटे शुद्ध हवा व सूर्याचे कोवळे ऊन घ्या.     १२. दररोज १०-१५ मिनिटे जॉगिंग  करा.     १३. दररोज १०-१५ मिनिटे पळा. (जागच्या जागी सुद्धा चालेल)    १४. जेवणातील पदार्थात भरपूर विविधता असू द्या,(म्हणजे प्रमाण जास्त नको तर जास्त पौष्टिक असावे)    १५.  शांत चित्ताने हळूहळू संथपणे नीट चाऊन खा. (वाघ मागे लागल्यासारखे भराभरा न चावता नुसते गिळू नका)     १६. दोन जेवणाचे मध्ये छोटा उपहार घ्या.     १७. जीवनात नेहमी आनंद व हास्य असू द्या.     १८.  सकाळची न्याहरी घेणे कधीच चुकवू नका.     १९. रात्रीची झोप किमान सात तास घ्या.    २०. रात्रीची झोपण्याची वेळ काटेकोरपणे पाळा.  (शक्यतो रात्री १० वाजता झोपावे)     २१. आहारात तंतुमय (Fibber) पदार्थांचा वापर वाढवा.    २२. जेवणात रसरशीत नैसर्गिक रंग असलेले अन्न-पदार्थ असू द्या.     २३. योगासन वर्ग लावा व योगासने करा. किमान बारा सूर्य नमस्कार घाला.     २४. प्रेम व आनंद देणार्याै व्यक्ति सदैव तुमच्या सभोवताली असतील याची दक्षता घ्या  .   २५. लक्षात ठेवा आरोग्याला चांगले असणारे पदार्थ जिभेला आवडतीलच असे नव्हे.     २६.  दोन वेळा 'ग्रीन' चहा प्या.     २७. घाम येईल इतका व्यायाम करा.     २८. आर्थिक तणाव टाळण्यासाठी किमान एक वर्षाच्या खर्चाला पुरेल एव्हढी रक्कम सेव्हिंग करा.     ३०. आठवड्यातून दोनदा तरी ३० मिनिटे पुलअप – पुशअप व्यायाम करा.     ३१.  जेवणापुर्वी अर्धा तास अर्धी मूठ शेंगदाणे खा.     ३२. वर्षातून एकदा ट्रेडमिल टेस्ट करून घ्या.   ३३. एक घास बत्तीस वेळा चाऊन खा.     ३४.  'ड' जीवनसत्वयुक्त पूरक आहार (supplementary) घ्या.     ३५. जेवणात दोन चमचे गाईचे तूप वापरा.     ३६. म्हशीच्या दुधात जास्त स्निग्धांश असलेल्या दूचे ऐवजी  गाईचे कमी स्निग्धांश असलेले दूध वापरा.     ३७. सकाळच्या न्याहरीत भाजणीचे थालीपीठ,सांजा,पोहे,भाज्याचे पराठे असे सकस व पौष्टिक पदार्थ  असावेत.     ३८.  जेवणासोबत कृत्रिम थंड पेये घेणे टाळा.(कोका कोळा,थम्सअप,लीम्का इत्यादी.)     ३९. जेवणापूर्वी हात-पाय  साबणाने स्वच्छ धुवा व निर्जंतुक करा.     ४०. नेहमी गरम  व ताजे जेवण घेत जा.     ४१. रोज थोडा आल्याचा छोटा तुकडा खा.     ४२. रोज एक-दोन लसणाच्या कच्च्या पाकळ्या खा.     ४३. साखरेचा वापर अतिशय कमी करा.     ४४. पदार्थ बनवताना तेलाचा वापर शक्य तितका कमी करा. वरुन कच्चे तेल घेऊ नका. तळणीसाठी एकदा वापरलेले तेल पुन्हा वापरू नका     ४५. एकाच प्रकारचे तेल न वापरता करडई,शेंगदाणा, सनफ्लॉवर,सोयाबीन,पाम,राईसब्रान,मोहरी,ऑलीव्ह अशी मिश्र तेल एकत्र करून वापरल्यास प्रत्येकातील काही चांगले गुणधर्म मिळून येतील.     ४६. भातासाठी हातसडीचा किंवा बिनसडलेला  तांदूळ वापरा.     ४७. गिरणीतून गहू दळून आणताना त्यात सोयाबीन घाला. (एक किलोला १०० ग्राम)     ४८. सकाळी दोन खजुर,राजगिरा लाडू / रोल ,मोरावळा खावा.     ४९. आहारात नाचणीचा समावेश करा.     ५०. शक्य तितके मिठाचे प्रमाण कमी करा. भाजी, आमटी, पदार्थ अळणी वाटल्यास वरून मीठ घालून घेऊ नका.     ५१.  जास्त खाणे टाळा . (लक्षात ठेवा "अति खाणे अन् मसणांत जाणे")     ५२.  झोपण्यापूर्वी किमान ३ तास आधी काहीही खाऊ नये / जेवू नये.     ५३. जेवणानंतर शतपावली घाला . (शंभर पावले चाला)    ५४. जेवणानंतर लगेच झोपू नका.     ५५. आठवड्यातून एक वेळ उपवास करा.     ५६. दिवसातून १० मिनिटे मौनव्रत पाळा.     ५७. आठवड्यातून किमान एकदा मैदानी खेळ खेळा.     ५८. दिवसातून एकदा अर्धा तास चांगल्या पुस्तकांचे वाचन करा.     ५९. सकाळी आंघोळीनंतर दहा मिनिटे प्रार्थना करा.     ६०. सकाळी आंघोळीनंतर दहा मिनिटे "ध्यान" (Meditation) करा.     ६१. इतरांबरोबर स्वत:ची तुलना कधीही करू नका.     ६२. तुमच्या आवडीचेच काम करा.     ६३. नावडते काम / नोकरी ताबडतोब सोडा.     ६४. सदैव तुमच्या कुटुंबियांच्या संपर्कात / सान्निद्ध्यांत रहा.     ६५. मित्रांच्या सान्निद्ध्यांत रहा.     ६६. रोज एका तरी व्यक्तीच्य  ा हिताचे / भल्याचे कृत्य करा.     ६७. रोज एका तरी व्यक्तिला माफ करत जा.     ६८. जेंव्हा दामल्यासारखे वाटेल तेंव्हा थोडी विश्रांति घ्या / आराम करा.     ६९. मुक्तपणे जोरात हसा.     ७०. धूम्रपान वर्ज्य करा.   ७१. मद्यपान वर्ज्य करा.     ७२. गुटखा / तंबाखू  आदी व्यसनांपासून  दूर रहा.     ७३. पत्त्यांचा जुगार,मटका, रेस, अशा मार्गांपासून दूर रहा.     ७४. आठवड्यातून काही वेळ निसर्गाच्या सान्निद्ध्यांत घालवा.     ७५. सकाळी दंव पडलेल असतांना हिरवळीवरून अनवाणी चाला.     ७६. जरूर असेल तेंव्हा मदत मागा.     ७७. सकारात्मक विचार करा.  ७८. नकारात्मक विचार प्रयत्नपूर्वक मनातून काढून टाका.     ७९. लिफ्ट  वापर न करता जिन्यांचा वापर करा.     ८१.दूध,अंडी,मासे,चीज,हिरव्या पालेभाज्या  अशा कॅलशियमयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करा.     ८२. हिरव्या पालेभाज्या , सॅलड ,कोशिंबीरी (यात मोड आलेली कच्ची कडधान्ये असावीत) भरपूर प्रमाणात खा.     ८३. मोड आलेली कडधान्यांच्याउसळी करून खा.       ८४.  मधून मधून डोळे व चेहरा गार पाण्याने धुवा.     ८५. वर्षातून एकदा ट्रीपला जाऊन येत जा.     ८६. आरामदायी पादत्राणे वापरा.     ८७. मुक्तपणे व आनंदाने नाचा.     ८८. मुक्तपणे व आनंदाने गा.     ८९. तडस लागेल इतके न जेवता पोटात जेव्हढी जागा (भूक) असेल त्याच्या  फक्त ८०% खा. (लक्षात ठेवा "दोन घास भुकी तो सुखी")     ९०. एखाद्या जवळच्या जुन्या मित्राशी / स्नेह्याशी वेळ काढून ५-१० मिनिटे फोनवर बोला.     ९१. तुमच्या दातांची योग्य निगा राखा /काळजी घ्या. सकाळी व रात्री दोन वेळा ब्रशने दांत साफ करा.     ९२. बागकामात मन रमवा.     ९३. सूती व सैल कपडे वापरा,तंग कपडे वापरणे टाळा.     ९४. नियमित पोहायला जा.     ९५. स्वत:चा आत्म विश्वास वाढवा.     ९६. जीवनाचा उद्देश व उद्दीष्ट लक्षात घेऊन जगा व जीवनातील आनंद लुटा.     ९७. नियमितपणे मोकळ्या हवेत / बागेत फिरायला जात जा.     ९८. नियमितपणे नाटक / सिनेमा / संगीताचा जलसा / व्याख्यान अशा अभिरुचीसंपन्न / मनोरंजन कार्यक्रमास अवश्य जा.     ९९. तुम्ही दमला असाल तरीही रेटून काम न करता थोडा वेळ काढून आराम करा / विश्रांती घ्या.     १००. प्रकृतीच्या कारणाने कधी कधी कामास नकार द्यायला शिका.     १०१. तुमची प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी मधाचा योग्य वापर करा.     १०३. आरोग्यासाठी स्वयंचलित वाहनाऐवजी सायकलचा वापर करा.     १०४. तुमच्या भावनिक समस्या इतरांजवळ व्यक्त करू नका.     १०५. नकारात्मक व्यक्तींना टाळा / तुमच्यापासुन दोन हात दूरच ठेवा .     १०६. एखाद्या समाजहिताच्या कार्यात स्वयंसेवक म्हणून काम करा.     १०७. नियमित रक्तदान करा.     १०८. समाजाचे ऋण मान्य करून परतफेड म्हणून सेवाभावी संस्थांना यथाशक्ती मदत करा.     १०९. साधी रहाणी व उच्च विचारसारणी ठेवा.     ११०. एक नवी परोपकार वही चालू करून त्यांत रोज केलेल्या एका तरी परोपकाराची नोंद करत जा.     १११. पैशांची व अन्नाची  उधळपट्टी करू नका.     ११२. लोणची,फरसाण असे खारवलेले पदार्थ जास्त खाऊ नका. त्यांत मोनोसाच्युरेटेड फॅटस् असतात जी आरोग्याला घातक असतात.     ११३.भजी,वडे,कुरर्डया,पापड,पापड्या असे तेलकट पदार्थ जे आरोग्याला अपायकारक आहेत,कमी प्रमाणात खा.      ११४. मैदा, मैद्याचे आणि बेकरीचे बिस्किटे,केक असे पदार्थ कमी प्रमाणात खा.     ११५. बाजारात  मिळणारे जंक व फास्ट फूड खाणे टाळा.     ११६.श्रीखंड,बासुंदी,गुलाबजाम ,लाडू असे मिठाईचे गोड पदार्थ मोजकेच खा व मनावर संयम ठेवा.     ११७. अतिरिक्त चहा,कॉफी, एरिएटेड थंड पेये न पिता रवी खालचे ताजे अदमुरे गोडसर ताक,लिंबू सरबत,सोलकढी, कोकम,ताज्या फळांचे रस प्या.     ११८. शिळे,नासलेले ,आंबलेले अन्न व उतरलेली फळे खाऊ नका.     ११९. बाजारात अस्वच्छ जागी उघड्यावर बनवलेले  पदार्थ खाऊ नका.     १२०. शेवग्याच्या शेंगा, कारली,कुळीथ,हादग्याचीफुले,अळू,पुदिना,कढीपत्ता,मेथी,मुळा, पालक,कांदापात, लसूणपात,गवार,सुरण,लिंबू,कोथिंबीर,,आले ह्या  व अशा अनेक हर्बल भाज्यांचा त्यांचे गुणधर्म लक्षांत घेऊन जेवणात जाणीवपूर्वक वापर करावा.     १२१. ऋतुमानानुसार आहारात योग्य बदल करत जावा.     १२२. शक्यतो शाकाहारच घ्यावा. मांसाहार वर्ज्य करावा.     १२३. जिभेला कायम लगाम घालून ताब्यात ठेवावे, तिचे जास्त चोचले पुरवत बसू नये. (लक्षात असू द्या की जीभ ज्याची आग्रहाने मागणी  करते ते नेहमीच आरोग्यास अपायकारक असते)    १२४. प्रकृतीस न झेपणारे उपास करू नयेत त्यांनी अपायच होतो.     १२५. उपासाचे दिवशी उपासाचे म्हणून आपण जे खातो ते नेहमीच पित्त वाढवणारे व प्रकृतीस अपायकारक असतात.     १२६. व्रत-वैकल्ये,उपास-तापास प्रमाणाबाहेर व प्रकृतीस न झेपतील  असे करू नयेत.     १२७. जेवणाच्या वेळा कटाक्षपूर्वक पाळाव्यात. ( नाहीतर अॅरसिडीटीचा त्रास होतो)     १२८. आपल्याला ज्याची अॅलर्जी आहे ते लक्षांत घेऊन असे पदार्थ आहारात टाळावेत.     १२९. नियमितपणे व वक्तशीर राहून डॉक्टरांच्या सल्ल्याने शारीरिक तपासण्या करून घेत जा.     १३०. तुमच्या व्याधींवर डॉक्टर  ांनी लिहून दिलेली औषधे / गोळ्या वेळचे वेळी न चुकता घेत जा व पथ्य पाळा.     १३१. तुम्ही स्वत:च घरच्या घरी मनाने किंवा डॉक्टरांचा सल्ला न घेता कोणतीही औषधे घेऊ नका.     १३२. मुदतबाह्य झालेली औषधे घेऊ नका.     १३३. टि.व्ही. समोर बसून जेवण घेणे बंद करा. कुटुंबियांसमवेत एका टेबलावर सर्व मिळून हास्य-विनोद करत जेवण घ्या.     १३४. संगणकावर काम करत असणारांनी लाकडी (पूर्वी सरकारी कार्यालयात होत्या तशी) खुर्ची वापरावी खुर्चीवर ताठ बसावे,संगणकाच्या पडद्या पासून किमान १८" अंतर ठेवावे व दर तासाने तोंडावर थंड पाण्याचा मारा करून व डोळे धुवून घ्यावेत व थोडे चालून यावे.     १३५. भ्रमणध्वनीचा (मोबाईलचा) अतिरिक्त वापर व वाहन चालवतांना वापर कटाक्षाने टाळावा.     १३६. पंखे,ए.सी. यांचा अनावश्यक वापर टाळावा.     १३७. शक्यतो थंड पाण्याने आंघोळ करणे उत्तम.     १३८. लवकर निजा व लवकर उठा. जागरणे करणे टाळा.     १३९.तेलकट,चमचमीत,मसालेदार,अत्यंत जहाल तिखट ,जास्त गोड अशा पदार्थांचे सेवन करू नये.     १४०. तुमच्या शारीरिक व्याधी लक्षात ठेऊन त्यानुसार पाथ्य-पाणी, औषधे याबाबत दक्षता घ्या.    जन हितार्थ द्वारा  आयुर्वेद चिकित्सालय